Breaking News

तरुणांनो आपले लक्ष्य मोठे ठेवा, जगावर राज्य कराल!

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचे प्रतिपादन

रोहे : प्रतिनिधी

तरुणांनी भविष्याचा विचार केला पाहिजे. भविष्यातील   आव्हाने पेलण्यासाठी केवळ नोकरीवर अवलंबून न राहाता आपले लक्ष्य मोठे ठेवल्यास तुम्ही जगावर राज्य कराल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी मंगळवारी (दि. 23) रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात केले. भारतीय जनता पक्षाच्या रायगड लोकसभा प्रवास योजनेदरम्यान मंगळवारी रोह्यात झालेल्या युवा मतदार संवाद या कार्यक्रमात ना. प्रल्हादसिंह पटेल मार्गदर्शन करीत होते. भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विनय नातू, भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग, रवी मुंडे, वैकुंठ पाटील, राजेश मापारा, मारुती देवरे, राजेश डाके, कृष्णा बामणे, रोशन चाफेकर आदी या वेळी व्यासपिठावर उपस्थित होते. धाटाव औद्योगिक क्षेत्रातील 20 टक्के कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. तरुणांना काम मिळत नाही. आपण स्टार्ट अप इंडिया अंतर्गत या ठिकाणी कारखाने सुरू करावेत, तसेच स्पर्धा परीक्षा  केंद्र व औद्योगिक क्षेत्रात उद्योग केंद्र सुरू करावेत, अशी मागणी या वेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी ना. प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडे केली. या वेळी उपस्थित तरुणांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांतील अडचणी, बँकेचे असहकार, तसेच गड, दुर्गाविषयी पुरातन विभागाची उदासीनता या विषयीचे प्रश्न उपस्थित केले. या कार्यक्रमाला रोहा तालुक्यातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply