Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सामंजस्य करार

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात गुरुवारी (दि. 25) अकाऊन्ट व फायनन्स विभागाच्या वतीने (सत्यम टॅक्स अकाऊंन्ट इन्स्टिट्यूट) मुंबईसोबत (एमओयू) सामजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सत्यम टॅक्स अकाऊन्ट इन्टीटूटचे संदीप मालुसरे हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट लिखित स्वरूपात एमओयूमधून दोन्ही संस्थाच्या ज्ञान व संसाधनामधे आवश्यक योगदान देण्याची हमी करार हत्साक्षरीत करण्यात आला. एमओयूमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना वर्कशॉप सेमिनार, स्टूडंट डेव्हलपमेट, केसस्टडी डेव्हलपमेट, सर्टिफाइड टक्स कोर्सेस, सर्टिफाइड डीजीटल मार्केटिंग या माध्यमातून सत्यम टॅक्स अकाऊन्ट इनस्टीटूट मुंबई यामध्ये तर्कसंगत परिसंवाद घडून यावा. या करिता प्रयत्न केले जाते.

या कार्यक्रमामधे प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्षच्या समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे, अकाऊंन्ट आणि फायनन्स विभागाचे प्रमुख प्रा. प्रवर शर्मा, प्रा. मौसमी लांबे, प्रा. योगिता पाटील, प्रा. रित ठुले उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सुमारे 50 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आयोजकांची प्रशंसा केली. तसेच आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरूणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply