Breaking News

पनवेल भाजप सांस्कृतिक सेलतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल भाजप सांस्कृतिक सेलतर्फे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2022चे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मर्यादित असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या मंडळास 15 हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास 10 हजार रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांकास पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह अशी भरघोस रक्कमेची पारितोषिके असणार आहेत. स्पर्धेचे परीक्षण हे ऑफलाईन स्वरुपात असून आयोजकांचे परिक्षक पॅनेल प्रत्यक्ष मंडळाला भेट देऊन परीक्षण करतील. या स्पर्धेत सहभाग नोंदणीची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2022 असून (9029580343), (8097248877) किंवा (9619441367) या क्रमांकावर करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply