Tuesday , February 7 2023

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

महाड : प्रतिनिधी

येथील रामचंद्र जाधव प्रतिष्ठानकडून नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजन केले होते. त्यात लक्ष अकॅडमीचे डॉ. अजित पडवळ यांनी विद्यार्थ्यांना युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या तयारीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याच्या हेतूने रामचंद्र जाधव प्रतिष्ठानने  मार्गदर्शन शिबिर घेतले होते. कोणतेही न्यूनगंड न ठेवता मेहनतीने अभ्यास करून परीक्षेला सामोरे गेले पाहिजे, असे मत पडवळ यांनी व्यक्तकेले. या वेळी प्रशंसनीय गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रभाकर भुस्कुटे, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे डॉ. सुरेश येरुणकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिष्ठानचे मोहन ढाले, संदेश तोरसकर, ज्योती जाधव यांनी आभार मानले.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply