नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील सत्तासंघर्षाच्या वादावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी 29 ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवले होते. त्यानुसार गुरुवारी (दि. 25) सुनावणी होणे अपेक्षित होते, पण ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 29 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सातत्याने पुढे ढकलली जात होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्णमुरारी यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली होती. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले होते.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …