जनतेची कामे करण्याची धमक महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
आम्ही काम करण्यात जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे जो शब्द तुम्हाला देणार तो पूर्ण करून पुन्हा तुमच्यासमोर येऊ. आरोप अनेक जण करू शकतात, मात्र जनतेची कामे करण्याची जी धमक लागते ती महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघरमध्ये प्रचार रॅलीवेळी केले.
पनवेल मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. त्यांची खारघरमध्ये मंगळवारी (दि. 29) भव्य प्रचार रॅली निघाली. खारघर गावातील चेरोबा मंदिरात दर्शन घेऊन येथील प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर सेक्टर 12मधील ब्लॉक, ए ते एफ ब्लॉक आणि शेवटी शिवमंदिर असा प्रचार करण्यात आला.
येत्या 20 तारखेला कमळासमोरील बटन दाबून विकासाच्या दिशेने पाऊल उचलून पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदारांना केले.
या वेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, शत्रुघ्न काकडे, निलेश बावीस्कर, गुरूनाथ गायकर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, हर्षदा उपाध्याय, आरपीआयचे पनवेल महानगर अध्यक्ष प्रभाकर कांबळे, भाजप खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे, खारघर शहर अध्यक्ष साधना पवार, शिवसेना अध्यक्ष प्रसाद परब, चंचला बनकर, आरपीआय अध्यक्ष मल्हारी घाटविसावे, सुशील महाडिक, राष्ट्रवादीचे बळीराम नेताके, राजपुरोहित, संजय घरत, किरण पाटील, गुरू ठाकूर, अमर उपाध्याय, विनोद घरत, राजेश गायकर, मोना अडवाणी, वासुदेव पाटील, विजय पाटील, रामचंद्र पाटील, जगदीश घरत, विनोद घरत, सचिन वास्कर, प्रभाकर जोशी, जयदास तेलवणे, मुनाफ पटेल, मन्सूर पटेल, सफी पटेल, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, अक्षय लोखंडे, सुरेश ठाकूर, केतन नवघरे, आनंदा मोकाशी, संजय शर्मा, संजय मुळीक, विपुल चौटालिया, कुणाल संघाणी, संजय घरत, गुरू ठाकूर, शैलेंद्र त्रिपाठी, राजेंद्र अगरवाल, दीपक ठाकूर, श्यामला सुरेश, कांचन बिर्ला, सीमा खडकर, अंकिता वारंग, मधुमिता जेना, प्रिया दळवी, निर्मला यादव, अनिता जाधव, शोभा मिश्रा, मीनाक्षी अंतवाल, दुर्गादेवी, सीमा खडसे, गायत्री महापात्रा, सोमा बिस्वास, सोनल लहा, सुनीता देशमुख, जुमा चक्रवर्ती, नंदा पानसरे, शारदा भोसले, रत्नमाला पाटील, संध्या पटेल, ज्योती कासार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply