Breaking News

खासगी कारचालकांनाही भाडे घेण्यास मान्यता ; सरकार बनवतेय नवा नियम

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशभरात खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी ट्रॅफिक आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस मोठी होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून खासगी गाड्यांचा वापर कमर्शियल (व्यावसायिक) कारणासाठी करता यावा म्हणून परमिट जारी करण्याचा विचार सुरू आहे. नीती आयोगाने यासाठी एक पॉलिसी तयार केली आहे, मात्र ही सेवा सुरू करण्यासाठी कारमालकांना काही नियम आणि अटींची पूर्तता करावी लागेल. खासगी कारचालक दिवसाला कमर्शियल ट्रिपच्या तीन ते चार फेर्‍याच करू शकतो, असा नियम त्यात असणार आहे.

याबाबत प्रवाशांच्या सुरक्षेला विशेष  प्राधान्य देण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी खासगी वाहनांसाठी नियमावली बनवली जाणार आहे. त्यासाठी खासगी वाहनचालकांना राज्य परिवहन विभागातील मान्यताप्राप्त समीक्षकांकडून प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल. समीक्षकांकडे वाहनाचा पूर्ण तपशील असेल, जेणेकरून

कारमालक एका दिवसात तीन किंवा चारपेक्षा अधिक फेर्‍या मारू शकणार नाही आणि नियम मोडल्यास तातडीने त्याच्यावर कारवाई करता येणे शक्य होईल. याशिवाय खासगी कारमालकांना भाडे घेण्याआधी प्रवाशांचा विमाही उतरवावा लागेल. यासाठी सरकारकडून भाडे निश्चित केले जाणार नाही, तर भाडेनिश्चिती

बाजारभावानुसार असेल.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply