Breaking News

खासगी बस-जीपच्या अपघातात 15 जण ठार

हैदराबाद ः वृत्तसंस्था

हैदराबाद येथून बेंगळुरुकडे जाणार्‍या खासगी बस आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात 15 जण ठार झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी हा अपघात घडला असून यामध्ये अन्य सहा जण जखमी असल्याचेही समजते. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

कुरनुल जिल्ह्यातील वेलदुर्ती येथे हा अपघात घडला. अपघातातील मृत जोगुलम्बा गडवाळा जिल्ह्यातील रामापुरम गावातील रहिवासी आहेत. ते सर्व अनंतपूर येथील गुंटकल्लू येथे विवाह ठरवण्यासाठी जात होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर जीपने घरी परतत असताना वेलदुर्ती चेक पोस्ट येथे अपघात घडला. वेलदुर्ती चेक पोस्ट येथे जीप जात असताना विरुध्द दिशेने खासगी बस येत होती. समोरून येणार्‍या दुचाकीला चुकवण्याच्या प्रयत्नात बस दुभाजक ओलांडून जीपला धडकली.

दुचाकीशी टक्कर रोखण्याच्या प्रयत्नात असलेली बस जीपवर आदळून हा अपघात झाल्याची माहिती आंध्र प्रदेश पोलिसांनी दिली. ही धडक इतकी जोरदार होती की 10 जण जागीच ठार झाले. अपघातात जीपचा चक्काचूर झाला आहे. अनेक प्रवासी आत अडकून पडले होते. चार जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना कर्नूल येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply