खोपोली : प्रतिनिधी
ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरू केलेल्या नाकांबदीत भिवंडीतील चार अट्टल गुन्हेगारांना जिवंत काडतुसे आणि पिस्तुलासह जेरबंद करण्यात खोपोली पोलिसाना यश मिळाले आहे.
ईदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या आदेशाने जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई – पूणे महामार्गावर रॉकेल पॉईन्टजवळ वाहनांची तपासणी सुरू असताना एक संशयित कार पोलिसांना आढळली. पोलीस निरिक्षक धनाजी क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने कार अडवून, कारमधील चौघांची चौकशी केली असता, त्यांनी भिवंडी येथून आल्याचे सांगितले. परंतु पोलीस निरिक्षक क्षीरसागर यांना त्याचा संशय आल्याने चौघांची अंगझडती घेतली, तेंव्हा असता अबदान मुअज्जम अन्सारी याच्या कमरेला पिस्तुल आणि जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच इतर तिघांची तपासणी केली असता फिरोज इमामुद्दीन शेख, परवेज जुबेर अन्सारी आणि जाहिद जावेद खान (सर्व रा. भिवंडी, जि. ठाणे) यांच्याजवळ फाईट आढळली. खोपोली शहर पोलिसांनी त्या चौघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांची अधिक चौकशी सुरू
केली आहे.