पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील तुर्भे खोंडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक आणि वझरवाडी या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेने तीन सरपंचपदे जिंकली असून एका ठिकाणी श्रीराम विकास आघाडीचा सरपंच झाला आहे.
तुर्भे खोंडामध्ये सरपंच व सात सदस्य शिंदे गटाचे –
तुर्भे खोंडा येथील थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या कविता केशव खेडेकर (108 मते) यांनी मविआच्या प्रमिला प्रमोद महाडीक (101 मते) यांच्यावर विजय मिळविला. दीपक खेडेकर, चैताली गोळे, अश्विनी जाधव, निर्मला देवळेकर, रामचंद्र खेडेकर, अनिता गायकवाड आणि गोपाळ खेडेकर हे शिंदे गटाचे सात उमेदवार ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवडून आले आहेत.
वझरवाडीमध्ये सरपंच शिंदे गटाचा –
पोलादपूर तालुक्यातील वझरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या थेट लढतीमध्ये शिंदे गटाचे संभाजी जाधव (329 मते) यांनी मविआचे उमेदवार श्रीहास शिंदे (285 मते) यांचा पराभव केला. सोमवारी झालेल्या मतमोजणीत वझरवाडी ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाचा सरपंच आणि तीन सदस्य तर महाविकास आघाडीचे 4 सदस्य विजयी झाले.
पोलादपूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निकालामुळे शिंदे गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले आणि माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
प्रभाग : उमेदवार : मते
1 अ : कृष्णा जाधव : 111
: केशव शिंदे : 157 विजयी
1 ब : रेश्मा उतेकर : 133
अश्विनी चव्हाण : 148 :विजयी
1 क : मेघा जाधव : 110
वंदना जाधव : 143 : विजयी
2 अ : विठ्ठल उतेकर : 92 : विजयी
सखाराम जगताप : 79
2 ब : भारती चव्हाण : 79
श्रध्दा चव्हाण : 93 : विजयी
3 अ : सखाराम चव्हाण : 32
: रोहित जाधव : 140 : विजयी
3 ब : संगिता घोलप : 150 :विजयी
: अंजली वायकर : 22 मते
तुर्भे बुद्रुकमध्ये तीन बिनविरोध
तुर्भे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या सुरेखा गोळे (319 मते विजयी) यांनी निशा शेलार (177 मते) यांच्यावर मात केली.
प्रभाग : उमेदवार : मते
1 अ : पूजा गोळे : 132 : विजयी
: किरण गोळे :116,
: संचिता बेलोसे : 52
1 ब : राजेश साळवी : बिनविरोध
2 अ : हेमंत गोळे : बिनविरोध
2 ब : मंगल गोळे : बिनविरोध
3 अ : रेश्मा मरगजे ़ : 132 : विजयी
: सुवर्णा शेलार : 52
3 ब : विकास शिंदे : 67
: अशोक शेलार : 89 : विजयी
तुर्भे खुर्दमध्ये श्रीराम विकास आघाडीचा सरपंच
तालुक्यातील तुर्भे खुर्द येथे सरपंचपदाच्या निवडणुकीत श्रीराम विकास आघाडीचे गोविंद उतेकर (338 मते) विजयी झाले. त्यांनी तुकाराम उतेकर (281 मते) यांच्यावर
विजय मिळविला.
प्रभाग : उमेदवार : मते
1 अ : अविनाश उतेकर : 151 : विजयी
: ओंकार उतेकर : 148
1 ब : प्रणिता उतेकर : 127
: रेणुका उतेकर ़ : 178 : विजयी
1 क : सुरेखा उतेकर : 109
: रंजना मोरे : 173 : विजयी
2 अ : ओमकार उतेकर : 127 : विजयी
: संजय जाधव : 39
2 ब : सुमिता उतेकर : 54
: चंद्रभागा दळवी : 114 : विजयी
3 अ : राजेश उतेकर : 81 : विजयी
: विशाल उतेकर : 72
3 ब : उषा उतेकर : 84 : विजयी
: गुलाब उतेकर : 69