पनवेल ः प्रतिनिधी
कळंबोली येथील कोविड सेंटरकरिता पनवेल महापालिका रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेणार आहे. त्याचप्रमाणे पनेवल शहरातील चार धोकादायक शौचालये निष्कासित करण्याचाही निर्णय शुक्रवारी (दि. 20) झालेल्या महासभेत घेण्यात आला.
पनवेल महापालिकेची महासभा शुक्रवारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या वेळी उपमहापौर जगदिश गायकवाड, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव धैर्यशील जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कळंबोली येथे भारतीय कापूस निगमच्या गोदामांमध्ये सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरकरिता रायगड सुरक्षा रक्षक मंडळ यांचे सुरक्षा रक्षक घेणे तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून सुरक्षा रक्षक घेणे असे सुरक्षा रक्षक घेण्यास या वेळी महासभेने मंजुरी दिली.
पनवेल शहरातील चार धोकादायक शौचालये निष्कासित करण्यासही महासभेने मंजुरी दिली. यामध्ये एमएसईडीसीएल कार्यालयालगतचे शौचालय, हुतात्मा स्मारकासमोरील शौचालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथील रोझ बाजारमधील शौचालय तसेच लाइन आळी येथील सुतार पेंटर घराजवळील शौचालय यांचा यामध्ये समावेश आहे.
प्रश्नोतरांच्या तासाला विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली. मुख्य लेखापरीक्षक विठ्ठल सुडे आणि सहाय्यक आयुक्त तथा लेखाधिकारी चंद्रशेखर खामकर यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्याने या वेळी त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …