जनता दरबारसह विविध ठिकाणी उपस्थिती
अलिबाग ः प्रतिनिधी
राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सोमवारी (दि. 31) रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून ते अलिबागमध्ये जनता दरबारसह विविध ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सकाळी 9.30 वाजता आक्षी ग्रामपंचायत येथे मराठी भाषेतील आद्य शिलालेख परिसर सुशोभिकरण करणे या कामाचे उद्घाटन करण्यात आहेत. त्यांच्या उपस्थितीत 10 वाजता अलिबाग तालुक्यातील साबरकुंड धरण प्रकल्प भूसंपादनसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व 10.30 वाजता आंबेत पूलसंदर्भात आढावा बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलीस मुख्यालय येथे मानवंदना संचलन कार्यक्रम, 11.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात जनता दरबार, दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद आणि 2.30 वाजता कार्यकर्त्यांच्या भेटी पालकमंत्री तुषार शासकीय विश्रामगृहात घेणार आहेत. शेवटी दुपारी 3.45 वाजता सोगाव येथील चंद्रकला कुमार कदम यांच्या स्टूडिओ व निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन ते मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.