Breaking News

रायगडात जिल्हा परिषदेची रंगीत तालीम

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी

अलिबाग : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचयातींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका म्हणजे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांना महत्व प्रप्त झाले आहे. ग्रामपंचयात निवडणुकांच्या निकालावरून जनतेचा कल सजून येणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणूकांच्या तयारीला लागले आहेत.
रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे अलिबाग, उरण, कर्जत, खालापूर, पनवेल, पेण, सुधागड, महाड, माणगाव, श्रीवर्धन, रोहा, मुरूड, तळा, म्हसळा, पोलादपूर या 15 तालुक्यांतील  ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत.
अलिबाग तालुक्यातील सहा, मुरूड तालुक्यातील पाच, पेण तालुक्यातील 26, पनवेल तालुक्यातील 10, उरण तालुक्यातील 18, कर्जत तालुक्यातील सात, खालापूर तालुक्यातील 14, रोहा तालुक्यातील पाच, सुधागड तालुक्यातील 14, माणगाव तालुक्यातील 19, तळा तालुक्यातील एक, महाड तालुक्यातील 73, पोलादपूर तालुक्यातील 16, म्हसळा तालुक्यातील 13, श्रीवर्धन तालुक्यातील 13 अशा एकूण 240 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाण ग्रामपंचयात निवडणूका होेत आहेत. यातून जिल्ह्यातील मतदारांचा कल दिवसूनर येईल. त्यानुसार आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच रणनिती ठरवली जाईल. ही ग्रामपंचायत निवडणूक आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे.
निवडणूक होणार्‍या तालुकानिहाय ग्रमापंचाती
अलिबाग  आक्षी, नारंगी, बोरीस, मुळे, वैजाळी, शिरवली, मुरूड ः काकळघर, कोर्लई, तेलवडे, वावडुंगी, वेळास्ते, पेण ः  आंबिवली, आमटेम, कणे, करोटी, कळवे, काराव, कोप्रोली, कोलेटी, खरोशी, जिते, डोलवी, दादर, दूरशेत, निगडे, पाटणोली, मळेघर, मसद बुद्रूक, मुंढाणी, रोडे, वरप, वरसई, वाशीवली, सापोली, सावरसई, सोनखार, हमरापूर, पनवेल ः करंजाडे, कानपोली, केळवणे, चिंध्रण, दिघाटी, नितळस, नेरे, भाताण, शिरढोण, शिवकर, उरण ः करळ, कळंबुसरे, घारापुरी, चिर्ले, जसखार, डोंगरी, धुतूम, नवघर, नवीन शेवा, पागोटे, पाणजे, पिरकोन, पुनाडे, बोकडविरा, भेंडखळ, रानसई, वशेणी, सारडे कर्जत ः उक्रूळ, कळंब, कोदिवडे, दहिवली तर्फे वरेडी, मांडवणे, वावळोली, वेणगांव, खालापूर ः आपटी, खरीवली, गोरठण बुद्रूक, चावणी, टेंभरी, देवन्हावे, नडोदे, माडप, वडवळ, वावंढळ, वावोशी, साजगांव, हाळखुर्द, होराळे, रोहा ः खैरे खुर्द, तळवेलीतर्फे आष्टमी, दापोली, पहूर, पुई,  सुधागड ः अडुळसे, आतोणे, आपटवणे, खवली, खांडपोली, घोटवडे, चंदरगाव, चिवे, ताडगाव, तिवरे, माणगाव बुद्रूक, शिळोशी, सिध्देश्वर बुद्रूक, हातोंड, माणगाव : करंबेळी, कुंभे, कुमशेत, गारेगाव, चिंचवली, टोळखुर्द, डोंगरोली, दहिवली कोंड, नांदवी, न्हावे, पळसप, पहेल, भागाड, मांगरूळ, मुठवलीतर्फे तळे, शिरवलीतर्फे निजामपूर, साई, हरकोल, होडगाव,  तळा ः रहाटाड, महाड ः अप्पर तुडील, आंबवडे, आचळोली, आढी, आदिस्ते, उंदेरी, करंजखोल, करंजाडी, कांबळेतर्फे बिरवाडी, कावळेतर्फे विन्हेरे, किंजळघर, कुंबळे, कुर्ले, कुसगाव, केंबुर्ली, कोझर, कोथेरी, कोल, कोळोसे, खुटील, गोंडाळे, गोठे बुद्रूक, घावरेकोंड, चांभारखिंड, चिंभावे, चिंभावे मोहल्ला, जुई बुद्रूक, तळीये, ताम्हाणे, दादली, दापोली, दासगावा, धामणे, नडगाव तर्फे तुडील, नडगावतर्फे बिरवाडी, नांदगाव बुद्रूक, नागाव, नाते, नातोंडी, निगडे, पंदेरी, पाचाड, पारमाची, पाले, पिंपळवाडी, पुनाडे, फाळकेवाडी, बासरगाव, बिजघर, मोहोत, मोहोप्रे, राजिवली, रानवडी खुर्द, रावतळी, रूपवली, लाडवली, लोअरतुडील, वडवली, वरंध, वराठी, वहूर, वाघोली, वामणे, वारंगी, वाळणे खुर्द, वाळसुरे, वीर, शिरगाव, शिरवली, शिरसवणे, सावाणे, साकडी, सावरट, पोलादपूर ः आंबेळी, उमरठ, कापडे खुर्द, कालवली, कोतवाल खुर्द, कोतवाल बुद्रूक, गोळेगणी, चांभारगणी बुद्रूक, दिवील, धामणदिवी, परसूले, पाले, पैठण, बोरघर, भोगाव खुर्द, लोहारे  म्हसळा ः कणघर, कांदळवाडा, काळसुरी, खरसई, घोणसे, तोंडसूरे, तोराडी, देवघर, निगडी, फळसप, रेवळी, लेप, संदेरी श्रीवर्धन ः कुडकी, गुळधे, चिखलप, जसवली, दिवेआगर, मेघरे, रानवली, वाजळे, वाळवटी, शेखाडी, सर्वे साखरोणे, सायगाव.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply