पनवेल : वृत्तसंस्था
कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोली यांनी हिंदूविरोधी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या कृत्याचा सर्वत्र विरोध होत असून पनवेल भारतीय जनता पक्षाने जारकिहोली यांच्याविरोधात शुक्रवारी (दि. 11) घोषणाबाजी करीत निषेध केला.
या वेळी भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, ज्येष्ठ नेते अजय कांडपिळे, करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, खांदा कॉलनी युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, गौरव कांडपिळे, देवांशू प्रभाळे, नितेश घुगे, अजिंक्य जाधव, अजित सिंग, प्रसाद कंधारे, अजित पवार, अक्षय सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी फलक झळकावून आणि घोषणा देऊन सतीश जारकिहोली यांचा जाहीर निषेध केला.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …