Breaking News

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलिसांची फौज तैनात

अलिबाग : प्रतिनिधी
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी  रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी 86 ठिकाणी 90 वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
अतिउत्साही पर्यटकांवर, मद्यपान करून वाहन चालविणार्‍या चालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांच्या तीन स्पीड बोटी रात्रंदिवस गस्त घालणार आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील प्रमुख समुद्रकिनार्‍यांवर तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. बीट मार्शल्स, दामिनी पथक, साध्या गणवेषातील कर्मचार्‍यांसह, सशस्त्र पोलीस बंदोबस्त किनार्‍यांवर ठेवला जाणार आहे. 76 अधिकारी 412 पोलीस अंमलदार तैनात केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याकडे विशेष पथके तयार करण्यात आले आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply