Tuesday , February 7 2023

मानसी वैशंपायन यांना शिक्षण माझा वसा पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त : उपक्रमशील मुख्याध्यापिका म्हणून फडके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांना शिक्षणविवेक पुणे व लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 2020 साठी दिल्या जाणार्‍या ‘शिक्षण माझा वसा’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. मानसी वैशंपायन यांचा हा गौरव नुकताच पुणे येथे हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गोर्हे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदार यांच्या हस्ते करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या भाषिक, गणितीय, वैज्ञानिक संकल्पनांचा विकास करण्याकरिता, कलागुणांना प्रोत्साहन देण्याकरिता विविध अभिनव उपक्रम तसेच ‘संवाद’ पाक्षिक, पालकांचे प्रगतिपुस्तक, विषय कोपरे हे विद्यालयाचे वेगळेपण जोपासणारे उपक्रम त्यांच्या कल्पनेतून साकारले आहेत.उत्तम नेतृत्व कौशल्य, प्रभावी वक्तृत्व, पालकस्नेही कार्यशैली असणार्‍या मुख्याध्यापिका व व्यासंगी लेखिका म्हणून त्या रायगड जिल्ह्यात सुपरिचित आहेत.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply