Breaking News

मत्स्यव्यवसाय कार्यालये एकाच छताखाली

अलिबागमध्ये नवीन संकुलाचे काम सुरू

अलिबाग : प्रतिनिधी : अलिबाग कोळीवाडा येथे असलेली मत्स्यव्यवसाय विभागाची जुनी प्रशासकीय इमारत मोडकळीस आल्यामुळे या इमारतीत असलेली मत्स्यव्यवसाय विभागाची सर्व कार्यालये इतरत्र हलविण्यात आली आहेत. येथे पुन्हा नवी इमारत बांधाण्यात येत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही सर्व कार्यालये पुन्हा एका छताखाली येणार आहेत.

मत्स्यव्यवसाय विभागाची जुन्या प्रशासकीय इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे यातील सर्व कार्यालये मागील 7 वर्षांपासून भाड्याच्या जागेत सुरू आहेत. जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम काही तांत्रिक कारणामुळे रखडले होते. मात्र आता सर्व परवानग्या मिळवून या नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. या  संकुलासाठी दोन कोटी 46 हजार इतका खर्च येणार आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या संकुलाच्या बांधकाम होत आहे. ही इमारत मुख्यत: प्रशिक्षण केंद्रासाठी वापरली जाणार आहे. वर्गखोल्या, सभागृह यांच्यासह मत्स्यसंग्रहालय येथे असणार आहे.  दुरवस्था झालेल्या जुन्या इमारतीचे बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आले असून, तेथे काही दिवसांपुर्वी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू झाले आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाशी सबंधीत कार्यालये एकाच ठिकाणी नसल्याने जिल्ह्यातून कामानिमित्ताने येणार्‍या मच्छिमार बांधवांना वेगवेगळ्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असत. या नव्या संकुलामध्ये परवाना विभाग, वसुली विभाग, उपायुक्तांचे कार्यालय, प्रशिक्षण केंद्र, मत्स्यसंग्रहालय असे विभाग असणार आहेत. यासह एक मध्यवर्ती सभागृह असणार असून, या ठिकाणी मच्छिमारांचे कार्यक्रम घेता येणार आहेत.

मत्स्यव्यवसायाशी सबंधीत असणारे विभाग नव्या संकुलात एकत्र येणार आहेत. प्रशासकीय कामाकाजाबरोबरच जिल्हाभरातून येणारे मच्छिमार बांधव, सोसायट्यांचे पदाधिकारी यांना हे सोयीचे होणार आहे.

-अभयसिंह शिंदे-इनामदार, उपायुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply