Breaking News

चोरीच्या 25 सायकली हस्तगत

सराईत चोरटा पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहर परिसरात उभ्या ठेवलेल्या सायकली चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून हजारो रुपये किमतीच्या सायकली हस्तगत केल्या आहेत.

पनवेल शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, हवालदार  रवींद्र राऊत, नाईक परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, विनोद देशमुख, रवींद्र पारधी, शिपाई विवेक पारासुर, प्रसाद घरत आदींच्या पथकाने आरोपीचा शोध घेत असताना सराईत सायकल चोर दिनेश रामदास जाधव (वय 35, धंदा हमाल काम, रा. कोळीवाडा, पनवेल) याची माहिती मिळाली त्या नुसार सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने पनवेल परिसरातून चोरलेल्या 25 पेक्षा जास्त हजारो रुपये किमतीच्या अत्याधुनिक व जुन्या सायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत .

पनवेल शहर पोलिसांनी 25 पेक्षा जास्त चोरीच्या सायकली हस्तगत केल्या आहेत. तरी ज्यांच्या सायकली चोरीस गेल्या असतील त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे आणून सायकलींची ओळख पटवून घ्यावी. -विजय कादबाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply