Breaking News

स्व. एन. डी. पाटील यांचे कार्य आदर्शवत : लोकनेते रामशेठ ठाकूर

कराड : रामप्रहर वृत्त
लढवय्ये नेते आणि ज्येष्ठ विचारवंत दिवंगत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तर आयुष्यात मोठे झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते मंगळवारी (दि. 17) कराड येथे आयोजित स्मृतिदिन कार्यक्रमात बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेच्या कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये संस्थेचे माजी चेअरमन दिवंगत एन. डी. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अ‍ॅड. रवींद्र पवार, माजी आमदार आनंदराव पाटील, जनरल बॉडी सदस्य किसनराव पाटील-घोणसीकर, अ‍ॅड. सदानंद चिंगळे, डॉ. दिलीपकुमार कसबे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, उपप्राचार्य एस. ए. पाटील, प्रा. डॉ. कोमल कुंदप, मुबीन हारुन मुजावर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांनी ‘एनडीं’च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्व. एन. डी. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत ते माझ्या प्रमुख गुरूंपैकी एक होते, असे नमूद केले. इतर मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्येही स्व. एन. डी. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर, प्राचार्य राजेंद्र साळुंखे, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply