पेण : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावर उंबर्डे गावच्या हद्दीत पायी जाणार्या पादचार्याला भरधाव मोटारीने धडक दिल्याने या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमीचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
फिर्यादी अंकुश बाळाजी लांगी (47) रा, रोडे, कांदळेपाडा ता.पेण यांचे वडील बाळाजी पोशा लांगी (वय 65) हे मंगळवार 17 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास उंबर्डे येथे त्यांच्या नात्यातील व्यक्ती मयत झाल्याने त्याचे अंत्यविधीकरिता पायी चालत मुंबई गोवा महामार्गावरील गोवा लेनवरील रस्ता ओलांडताना गोवा बाजुकडे जाणारी सफेद रंगाची फोर्ट कंपनीची इंडोवर गाडी नं. एमएच 02 सी.बी 6279 या गाडीवरील आरोपी चालकाने गाडी अतिवेगाने चालवून बाळाजी लांगी यांना जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्यास व पोटाला, पायाला लहान मोठया स्वरूपाच्या दुखापती झाल्या. यावेळी म्हात्रे हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. पेण पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Check Also
महापालिका कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर
म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …