Breaking News

श्रीवर्धन पोलिसांचे पथसंचलन

नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

श्रीवर्धन ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन पोलिसांकडून गुरुवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता संपूर्ण शहरात पथसंचलन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातच राहावे, असे आवाहन पोलीस करीत होते. श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार तसेच पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्यासह श्रीवर्धन पोलीस ठाण्यातील पोलिसांनी पथसंचलनात सहभाग घेतला.

श्रीवर्धन शहरात नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टन्सचे नियम पाळत आहेत. बहुतांश नागरिक मास्क घालूनच फिरताना दिसत आहेत. आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलीस, महसूल व नगर परिषद प्रशासनही लॉकडाऊनच्या काळात मेहनत घेत आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून पोलिसांच्या रजा, सुट्या सर्वकाही बंद आहे. त्यांना नागरिकांनीदेखील सहकार्य करणे आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका वगळता अद्याप कुठेही कोरोनाबाधित रुग्ण आढळले नाहीत. श्रीवर्धनमधील सात जणांना कोरोनासदृश लक्षणे आढळल्यामुळे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, परंतु त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply