Breaking News

हर घर नल हर घर जल!  भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्त कुडावेत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेली जनजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत भाजपचे जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल तालुक्यातील कुडावे गावात पाणीपुरवठा योजनेसाठी 63 लाख 65 हजार 237 रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 18) झाले. भूमिपूजन समारंभास भाजप युवा मोर्चाचे पळस्पे विभागीय अध्यक्ष योगेश लहाने, कुडावे गाव अध्यक्ष विनायक पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष सुनील गवंडी, नांदगावचे माजी सरपंच अविनाश गायकर, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य शरद वांगिलकर, तुरमाळेचे उपसरपंच दत्तात्रेय हातमोडे, माजी सरपंच राम हातमोडे, पळस्पे ग्रामपंचायतीचे सदस्य अजय तेजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply