चांदीची मूर्ती व पादुका चोरट्यांकडून लंपास
पेण ः प्रतिनिधी
पेण शहरातील कोळीवाडा येथील आई एकविरा मंदिरात बुधवारी (दि. 9) दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवीची चांदीची मूर्ती व पादुका असा चार किलो चांदीचा दीड लाखांचा ऐवज लंपास केला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, पेण पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाणी केली आहे. या अज्ञात चोरट्या विरोधात पेण पोलीस ठाण्यामधे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांनी तातडीने तपासासाठी टीम पोलिसांचे पथक रवाना केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहेत. लवकरात लवकर मूर्ती चोरट्याचा तपास लावण्यात यावा, अशी मागणी कोळी बांधवांनी केली आहे.