Breaking News

मुलांचा दैनंदिन आहार कसा असावा?

आजचा काळात आईवडील दोघेही कामकाजी असून कुटुंबही सीमित झाले. केवळ आईवडील आणि त्यांची मुले. अशा स्थितीत घरात मुलांकडे लक्ष देणारे कोणीच नसते. त्यामुळे मुलांच्या जेवणाची आभाळ होऊ लागते. जेवणाची आवडनिवड जास्त होऊ लागते किंवा मुले जेवणाचा कंटाळा करू लागतात. खाण्याच्या त्रासाने हतबल झालेले आईवडील मुलांना बाहेरचे खाऊ घालणे जास्त पसंत करतात. त्यामुळे मुलांना बाहेरचे पिझ्झा, बर्गर, चॉकलेट, आइस्क्रीम, चिप्स आवडू लागतात. अशाने त्यांना चांगला पोषक आहार मिळत नसल्याने ते वारंवार आजारी पडतात. त्यांची शारीरिक, मानसिक वाढ खुंटते. लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी त्यांना पोषक आहाराची गरज असते. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समतोल आणि संतुलित आहार गरजेचा असतो. आपली मुले सर्व ठिकाणी पुढे असावी, अशी पालकांची इच्छा असते. अशा वेळी त्यांना योग्य आहार मिळाला नाही तर त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. लहान मुलांच्या आवडीनिवडी खूप असतात. त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ मिळाले नाहीत, तर ते जेवायला कंटाळा करतात. त्यांना खाऊ घालणे कठीण होते. त्यासाठी आईने काही आहार पद्धतीचा वापर करायला हवा.

मुलांच्या योग्य वाढीसाठी दिवसातून तीन-चार वेळा खायला हवे. सकाळी नाश्ता, मग दुपारचे संतुलित आहाराचे जेवण, संध्याकाळी काही स्नॅक्स व रात्रीचे हलके जेवण अशा प्रकारे नियोजन करून आपण आपल्या मुलाच्या आहाराकडे लक्ष देऊ शकता.

मुलांच्या रोजच्या जेवणात सगळे पदार्थ पोळी, भाजी, वरण-भात, कोशिंबीर, सलाडचा समावेश असला पाहिजे. मुलांना आठवड्यातील सहाही दिवस पौष्टिक आहार दिला पाहिजे. आपल्याकडे खूप सणवार असतात. त्यामुळे मुलांना आपली संस्कृती व त्याच्याशी निगडित जेवणाच्या पद्धती कळायला हव्यात. पौष्टिक पदार्थ मुलांना खाऊ घालायला हवेत. रात्रीचे जेवण नेहमी हलकेच असले पाहिजे. रात्रीच्या जेवणात विविधता असायला हवी. ते पचायला सोपे असले पाहिजे. खिचडी, मऊ भात, वरण, भाजी, पोळी असे पदार्थ हवेत. रोजच्या जेवणात तूप द्यायलाच पाहिजे. तूप स्निग्ध असल्याने शरीरास गरजेचे असते. दर रविवारी मुलांच्या आवडीचे पदार्थ करावेत. त्यामध्येदेखील पौष्टिक आहाराचा समावेश पाहिजे. पदार्थ बाहेरचे नकोत, तर घरात बनवलेले असावेत.

आपल्या मुलांना बाहेरचे जंक फूड, पिझ्झा, पास्ता, बर्गर, नूडल्स तसेच

शीतपेय देणेसुद्धा टाळावे. मुलांना आठवड्यातून एकदाच बाहेर जेवायला घेऊन जायला हवे, पण त्यातही जंक फूडचा समावेश नसावा. ही पथ्ये पाळली तरच आपण आपल्या मुलांचे आरोग्य चांगले ठेवू शकता. परिणामी मुलांना सगळे खायची सवय लागून त्यांची शारीरिक, मानसिक वाढ उत्तमरीत्या होऊ शकते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply