खालापूर ः प्रतिनिधी
खालापूर-पेण मार्गावरील सावरोली गावाजवळ असलेल्या इंडिया बुल इमारत विकसक कंपनीसमोर पॅजोरो गाडीला आग लागली. घटनास्थळी असणार्या नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. या घटनेने सावरोली गावाजवळ अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. दुसरी घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील खंडाळा बोगद्याजवळ घडली. या घटनेत कार जळून खाक झाली. या दोन्ही घटना सायंकाळी 4.10 वा. सुमारास घडल्या. सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही.