Breaking News

रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

खारघर ः प्रतिनिधी

जनर्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ बुधवारी (दि. 8) मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा झाला. हा सोहळा संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करुन सीबीएसई परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या निरोप समारंभाची सुरुवात 11वीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत भाषणाने झाली आणि त्यानंतर गाणी आणि नृत्याचा कार्यक्रम झाला. या समारंभात अनेक स्पॉट बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या समारंभाचे मुख्य आकर्षण असलेल्या प्रिन्स आणि प्रिन्सेसचा कार्यक्रम उत्साहात झाला. यामध्ये हेडबॉय मास्टर आदेश परेश ठाकूर याने अंतिम फेरीत आपल्या पुरस्कार विजेत्या उत्तरासह प्रिन्सचा किताब पटकावला, तर प्रिन्सेसचा मुकुट अन्या पटेल हिने जिंकला. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी मुकूट घालून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. डीजेच्या तालावर नाचत या निरोप समारंभाची सांगता झाली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply