अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या दहावीच्या परीक्षेला गुरुवार (दि. 2)पासून सुरुवात होणार आहे. रायगड जिल्ह्यातील 35 हजार 733 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. जिल्ह्यात 74 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
परिक्षा निर्भय आणि मोकळ्या वातावरणात होण्यासाठी प्रशासनाने योग्य तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. या भरारी पथकांवर उपविभागीय अधिकारी यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा पातळीवर पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक हे परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.
परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षा देणारे विद्यार्थी, पर्यावेक्षक, परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेले कर्मचारी, भरारी पथके यांव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …