Breaking News

राष्ट्रीय ऑनलाइन परिसंवाद

कळंबोली : रामप्रहर वृत्त

सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालय कळंबोली येथील इतिहास विभाग व आयक्यूएसी डिपार्टमेंट व असोसिएशन सह इंटरनॅशनल जर्नल अ‍ॅण्ड रीसर्च इ पब्लिकेशनस  हैदराबाद, तेलंगणा आणि इतिहास विभाग, कन्या महाविद्यालय, गीतानगर,  गुवाहाटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रिसर्च स्टार मुर्थी एज्युकेशन कम्युनिटी सेंटर फॉर युथ, चित्तूर आंध्रप्रदेश यांच्या संयोजनाने दोन दिवसाचा राष्ट्रीय ऑनलाइन परिसंवाद 29 व 30 मे ला आयोजित करण्यात आला आहे.

परंपरा आणि आधुनिकता इतिहासातील दृष्टिकोन अन्वेषण, संस्कृती आणि साहित्य या संकल्पनेवर आधारित हा परिसंवाद असणार आहे. या परिसंवादासाठी देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा परिसंवाद आंतरविद्याशाखीय असल्याने देशभरातून विविध प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आपला शोध निबंध पाठवून नाव नोंदणी करत आहे.

29 व 30 तारखेला देशभरातून दहा तज्ञ साधन व्यक्तींचे  ऑनलाइन मार्गदर्शन लाभणार आहे, तसेच काही निवडक संशोधकांना आपला शोध निबंध सादर करता येणार आहे. आलेल्या सर्व शोध निबंधातून दर्जेदार शोध निबंधाची निवड करून त्याचे इंग्लिश, हिंदी व मराठी भाषेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शोधनिबंध संग्रह ग्रंथ प्रकाशित केला जाणार आहे.

सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, उपाध्यक्ष रविंद्र लिमये, सचिव रवी घोसाळकर, सर्व संचालक मंडळ यांनी  शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेकच एसएमडीएल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. सी. लहूपचांग, पीएचडी संशोधन केंद्र समन्वयक प्रा. डॉ. बी. बी. जाधव, आयक्यूएसी समन्वयक प्रा. प्रीती महाजन, प्रा. एस. के. गायकवाड आदींचा  सहभाग आहे. कन्या महाविद्यालय गुवाहाटीचे प्रा. गुप्तजित पाठक, प्रा. नकुल चंद्र दास, आदिती पाठक व सर्व टीमचे योगदान आहे. 26 मे 2020पर्यंत रजिस्ट्रेशन करावे, अशी आयोजकांची विनंती आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply