Breaking News

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्री सदस्यांकडून महास्वच्छता अभियान

अलिबाग : प्रतिनिधी
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांचे वतीने महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महास्वच्छता अभियान बुधवारी (दि. 1) राबविण्यात आले. या अभियानात अलिबाग शहरातील 20 किमी रस्ते, सरकारी कार्यालय परिसर, 1.50 किमी. समुद्रकिनारा स्वच्छ करून 39.777 टन कचरा संकलित केला.
या स्वच्छता मोहिमेमध्ये रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,  अलिबाग नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंगाई साळुंखे, राजिप अधिकारी निलेश घुले, भालेराव, मंडलीक, जयंत गायकवाड व पोलीस विभागील कर्मचारीही सहभागी झाले होते.
या स्वच्छता अभियानात अलिबाग शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, वनविभागाचे कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय, अँटिकरप्शन कार्यालय, जिल्हा रुग्णालय, धर्मादाय आयुक्त, जिल्हा कोषागार इत्यादी कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला, तसेच अलिबाग बसस्थानक व समुद्रकिनार्‍याची स्वच्छता करण्यात आली.
या महास्वच्छता अभियानामध्ये अलिबाग शहर स्वच्छता मोहिमेत 1975 श्रीसदस्य सहभागी झाले होते. टेम्पो, ट्रक्टर, ट्रक, घंटागाडी अशा एकूण 58 वाहनांच्या सहाय्याने एकूण 39.770 टन कचरा संकलित करुन अलिबाग नगरपालिका डम्पिंग ग्राउंड येथे जमा करण्यात आला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply