Breaking News

‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. 24) लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीमार्फत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सोमवारी सकाळी 9.30 वाजता पनवेल येथील संग्राम निवासस्थानी लोकनेते दि.बा. पाटील यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात अखिल आगरी परिषद आणि आगरी समाज मंडळ यांच्या वतीने आदरांजली कार्यक्रम, घणसोली गाव येथील लोकनेते दि.बा. पाटील सभागृहात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत महाआरोग्य शिबिर, भव्य कॅरम व बुद्धीबळ स्पर्धा, ठाणे जिल्ह्यातील कळवा खारीगाव येथे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत व्याख्यनामाला, कल्याण डोंबिवलीतील माणकोली येथील मानकोळेश्वर मंदिर येथे सकाळी 10.30 वाजता महाआरोग्य शिबिर, जासई येथील जिजामाता रुग्णालयात सकाळी 10.30 वाजता आरोग्य शिबिर तसेच उरणमध्ये महिला सक्षमीकरण कार्यक्रम व आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply