Breaking News

डॉक्टर भुलला स्वस्त सोन्याला

खालापुरातील घटना; सहा लाखाला लागला चुना

खोपोली : प्रतिनिधी

स्वस्त सोन्यासाठी खोपोलीतील एका नामांकित डॉक्टरची   सहा लाखला फसवणूक झाली आहे. डॉ. बन्सीलाल लक्ष्मण पाटील (रा. वृंदावन कॉम्पलेक्स, मुद्रे बुद्रुक, कर्जत) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव असून, त्यांचे खालची खोपोली (ता. खालापुर) येथे पाटील हेल्थकेअर सेंटर नावाचे रूग्णालय आहे.

दिनेश प्रजापती व त्याचे वङील वेळोवेळी रूग्ण म्हणून डॉ. बन्सीलाल यांच्या रूग्णालयामध्ये येवून उपचार घेत असत. डॉक्टरांसोबत प्रजापती पितापुत्रांनी जवळीक साधली होती. याचा फायदा घेत दिनेश व त्याच्या वडिलांनी  त्यांना खोदकाम करताना सोने सापडले आहे, असे डॉ. बन्सीलाल यांना सांगितले व सोन्याच्या सरी दाखवून त्यांचा विश्वास संपादन  केला. डॉक्टरांनी  त्यामधील काही मणी काढुन घेत ते मणी सोन्याचे आहेत, याची खात्री केली. प्रजापती पिता पुत्रांनी त्यांना पैशाची अडचण असल्याचे सांगून सोन्याच्या सरी डॉक्टर बन्सीलाल याच्याकङे गहाण ठेवुन त्यांच्याकडून सहा लाख रूपये रोख रक्कम घेतली होती. त्यानंतर प्रजापती पितापुत्र रूग्णालयात येण्याचे बंद झाले. मोबाईलही लागत नसल्याने संशय आलेल्या डॉ. बन्सीलाल यांनी सोन्याच्या सरी  सोनाराकङे तपासल्या असता सोनं नकली असल्याचे समजले.

दिनेश प्रजापती व त्याच्या वडीलांनी गंडविल्याचे लक्षात आल्यावर डॉ. पाटील यांनी खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली, त्यानुसार भादंविक 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक  येडेपाटील करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply