Breaking News

वडवली परिसरात सात गुरे दगावली

विषप्रयोग झाल्याचा शेतकर्‍यांचा आरोप

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील वडवली परिसरामधील नाल्याच्या बाजूला शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी सहा-सात गुरे दगावल्याचे समोर आले. ही गुरे नेमकी कशी दगावली आहेत, याची माहिती मिळाली नसली तरी विषप्रयोग झाला असल्याचा संशय शेतकरी आणि स्थानिकांनी केला आहे. कर्जत पंचायत समितीचे अधिकारी आणि पोलिसांनी या घटनेची पाहणी केली असून, शेतकर्‍यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पाली भूतीवली धरणातून वाहणारे पाणी ज्या नाल्यात येते, तो नाला पुढे  वडवली परिसरातून जातो. आसल, पाडा, बेकरे, वडवली येथील गुरे या नाल्यात पाणी पिण्यासाठी येतात. यातील सुमारे 6 ते 7 गुरे मृत पावल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात 1 म्हैस, 4 बैल व लहान वासरांचा समावेश आहे. या घटनेमुळे  परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ही गुरे नेमकी कशी दगावली आहेत, याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. मात्र विषप्रयोग  झाला असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारीनुसार नेरळ पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply