

कर्जत : बातमीदार
मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाले असून, त्या निमित्ताने नेरळमध्ये विजयी जल्लोष करण्यात आला. शहरातील शिवाजी महाराज चौकातून बाजारपेठ भागात मिरवणूक काढून आणि व्यापार्यांना लाडू वाटून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंनद साजरा केला.
नेरळमध्ये श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी मिळाली. त्याचा जल्लोष नेरळमध्ये साजरा करण्यात आला. शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठ भागात ढोल ताशाच्या सोबत मिरवणूक काढली. माथेरान रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाजारपेठ भागात खासदार बारणे यांच्या विजयाबद्दल लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला. नेरळ शिवसेना शाखेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ही विजयी मिरवणूक हुतात्मा हिराजी पाटील चौक, माथेरान रस्त्यामार्गे लोकमान्य टिळक चौकातून जुन्या बाजारपेठेतील भाजप कार्यालयात पोहचली. या मिरवणुकीत शिवसेना शहर प्रमुख रोहिदास मोरे, शिवसेना संपर्क प्रमुख किसन शिंदे, भाजप प्रज्ञा प्रकोष्ट सेलचे कोकण संयोजक नितीन कांदळगावकर, भाजप तालुका सरचिटणीस प्रवीण पोलकम, भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मृणाल खेडकर, भाजप शहर अध्यक्ष अनिल जैन, महिला मोर्चा शहर अध्यक्ष नीता कवाडकर, भाजप महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष वर्षा बोराडे, शिवसेना उपशहर प्रमुख बंडू क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य केतन पोतदार, माजी उपसरपंच बल्लाळ जोशी, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते माधव गायकवाड, मिलिंद साने, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भाऊ क्षीरसागर यांच्यासह शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे कार्यकर्ते या विजयी मिरवणूकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper