
अलिबाग ः प्रतिनिधी – जन शिक्षण संस्थान (जेएसएस) रायगडतर्फे एक लाख एक हजार 252 कापडी मास्क रायगड जिल्हा कारागृहातील कैदी, पोलीस तसेच शासकीय कर्मचार्यांसाठी मोफत वाटप करण्यात आले.
जन शिक्षण संस्थानने 28 एप्रिलपासून शिवणकला प्रशिक्षणाचा वापर करून कोरोनापासून बचावासाठी कापडी मास्क तयार केले. रायगड जिल्हा कारागृह अधीक्षक आबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मोफत मास्क वाटप करण्यात आले. शासकीय कर्मचार्यांसाठीही रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे मास्क सुपूर्द करण्यात आले.
जन शिक्षण संस्थान थोबल-मणिपूरचे संचालक रंजीत लैश्राम यांच्या ऑर्डरमधून अलिबाग नगरपालिका हद्दीतील गरजू भागांमध्ये, भाजी व मच्छी मार्केट परिसरात, वाडी-वस्त्यांमध्ये मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. रायगड जिल्हा पोलीस उपविभागीय कार्यालय येथील पोलीस कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोल्हे यांच्याकडे मास्क सुपूर्द करण्यात आले.
या वेळी जन शिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, बोर्ड मेंबर नरेंन जाधव, नीला तुळपुळे, संचालक विजय कोकणे, सुचिता गायकवाड, ज्ञानेश्वर खरात आदी उपस्थित होते.