खारघर : रामप्रहर वृत्त
खारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 9) झाले.
खारघर भारजपच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगरसेवक निलेश बावीस्कर यांच्या पुढाकाराने महिलांसाठी भव्य क्रिकेट स्पर्धा, हळदीकुंकू अणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सेक्टर 15 येथील गुडविल कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या मैदानावर क्रिकेट स्पर्धा रंगली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित महिलांसोबत संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक निलेश बावीस्कर, सरचिटणीस दीपक शिंदे, किरण पाटील, वास्तू विहार खारघर युथ कॉन्सिलचे सिंग, श्री. कोळी, कैलास अहिरे, संतोष सोनखांबळे, संजय शर्मा, अनंत मोकाशी, मोहन बुजवडकर, संजय शर्मा, मुकेश गर्ग, मिलन सोनी, प्रिया राजकुमार, पुष्पा राजपुरोहित, आर्य माने, शैलेश पुत्रान, तिवाजी, प्रतीक्षा माळी, छाया हरेल, श्री. शिंदे, श्री. पावशे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत 15 महिला संघांनी सहभाग घेतला.
Check Also
खास महिला दिनानिमित्तमराठीतील पाच लक्षवेधक अभिनेत्री
मराठी चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली इतिहासात अनेक गुणी अष्टपैलू, गुणी अभिनेत्रींचा सहभाग आहे. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक …