अलिबाग : प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात एकूण 78.80 टक्के मतदान झाले. 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. 15) मतदान प्रक्रिया झाली. या निवडणुकीची मतमोजणी येत्या सोमवारी (दि. 18) होणार आहे. जिल्ह्यात 15 पैकी 10 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी होती. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. दरम्यान, 78 ग्रामपंचायतींमधून राजकीय नशीब आजमावत असलेल्या 1588 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
मतदानाची टक्केवारी
तालुका मतदान
अलिबाग 85.84
पेण 83.81
पनवेल 78.52
उरण 75.28
कर्जत 82.89
रोहा 81.71
माणगाव 74.03
महाड 76.33
श्रीवर्धन 67.75
म्हसळा 46.78
एकूण 78.80