Breaking News

टी-20 वर्ल्डमध्ये होणार डीआरएस वापर

दुबई ः वृत्तसंस्था

17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) डीआरएसचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. टी- 20 वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच डीआरएसचा उपयोग केला जाणार आहे. मागचा वर्ल्डकप 2016मध्ये झाला होता तेव्हा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डीआरएस प्रणाली उपलब्ध नव्हती, पण महिलांच्या टी 20 विश्वचषकात याचा वापर केला गेला आहे. 2018मध्ये कॅरेबियन भूमीवर झालेलव्या महिला टी-20 विश्वचषकात डीआरएस प्रणालीचा वापर केला गेला. मैदानात पंचांकडून निर्णय घेताना झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी डीआरएसची सुरुवात करण्यात आली होती. डीआरएस घेत फलंदाज किंवा क्षेत्ररक्षण करणारी टीम पंचांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात. त्याचबरोबर स्टम्पिंगसारखे निर्णय घेताना मैदानातील पंच तिसर्‍या पंचांची मदत घेऊ शकतात. 2017पासून आयसीसीच्या सर्व मोठ्या स्पर्धेत डीआरएसचा वापर केला जात आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात आयसीसी गर्व्हनिंग कौन्सिलने क्रिकेटच्या सर्व प्रकारांत प्रत्येक सामन्याच्या प्रत्येक डावात प्रती संघ अतिरिक्त डीआरएस मंजूर केला आहे. यानंतर प्रत्येक संघाला टी-20 आणि एकदिवसीय सामन्यातील प्रत्येक डावात दोन रिव्ह्यू देण्यात आले, तर कसोटीतील प्रत्येक डावात तीन रिव्ह्यू देण्यात आले. आयसीसीने विलंबित आणि पावसामुळे होणार्‍या सामन्यांसाठी किमान षटकांची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. डकवर्थ लुईस निकाल मिळवण्यासाठी दोन्ही संघांना किमान पाच षटके फलंदाजी करणे आवश्यक आहे. हा नियम उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी वेगळा असेल. या दोन सामन्यांत प्रत्येक संघाला किमान 10 षटके फलंदाजी करणे आवश्यक आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply