न्यूयॉर्क : ‘आपण आपल्यातील असमानता नष्ट केली, तर कोरोनाचे संकटदेखील नष्ट करू शकू. कोरोना साथीच्या तिसर्या वर्षात प्रवेश करीत असताना मला विश्वास वाटतोय की, याच वर्षी कोरोनाला संपवू शकतो, पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक देशातील किमान 70 टक्के लोकसंख्या पूर्ण लसीकृत असायला हवी,’ असे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम यांनी म्हटले आहे. त्याच वेळी जगात जितकी जास्त असमानता असेल तेवढा हा विषाणू आपण कल्पनाही करू शकणार नाही किंवा बचाव करू शकणार नाही अशा पद्धतीने घातक होऊ शकतो, अशी भीतीही डॉ. टेड्रॉस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …