Breaking News

सर्व संघांचे सेनापती राणीच्या भेटीला

लंडन : वृत्तसंस्था

क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व दहा स्पर्धक राष्ट्रांच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारांनी बुधवारी इंग्लंडच्या राणीची भेट घेतली. राणी एलिझाबेथ यांच्यासोबतच त्यांनी लंडन येथील बकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स हॅरीचीही भेट घेतली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडून या भेटीची काही छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. यातीत एका छायाचित्रात राणीसह सर्व संघाचे खेळाडू दिसत आहेत, तर दुसर्‍या एका छायाचित्रात राणी खेळाडूंशी संवाद साधताना दिसत आहे. राजघराण्याकडूनही सोशल मीडियावर या भेटीची छायाचित्र पोस्ट करण्यात आली. बकिंघम पॅलेस येथील लंडन मॉल येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच सर्व संघांच्या कर्णधारांनी राणीची भेट घेतली. दरम्यान, सध्याच्या घडीला भारतीय क्रीडाविश्वासोत संपूर्ण विश्वात हवा आहे ती म्हणजे क्रिकेटच्या या महासंग्रामाची. गुरुवारपासून सुरू असणारा क्रिकेटचा हा महाकुंभ जवळपास पुढील दीड महिना क्रीडारसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply