नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर आज गुरुवारी (दि. 23) सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष जोशी यांनी केलेली मागणी फेटाळून लावली. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणीचा आणि निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना अपात्र घोषित करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटीसीला पायलट समर्थक आमदारांनी उच्च न्यायालायत आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाने 19 आमदारांच्या नोटीसीवर 24 जुलैपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले होते.
Check Also
रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …
RamPrahar – The Panvel Daily Paper