खारघर : रामप्रहर वृत्त
रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, खारघर रहिवासी कल्याण संघटना व रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जानेवारी रोजी खारघर मॅरेथॉन 2023 ही स्पर्धा आयोजित केली आहे. खारघरमधील महाविद्यालयात विविध स्पर्धा घेतयल्या. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धा 10 ते 16 जानेवारी या कालावधीत घेण्यात आल्या. यामध्ये महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा, एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये राजश्री सुर्वे यांनी प्रथम क्रमांक व शिवांशू काळे याने द्वितीय क्रमांक तसेच प्रगती मिश्रा हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच भित्तीपत्रक स्पर्धेत शिवानी कुमारी प्रथम, चेतन तामखाने द्वितीय व साक्षी पाटील व मेहेर हमीद खान यांनी तृतीय क्रमांक पटकाविले. याचबरोबर ब्लॉग लेखन स्पर्धेमध्ये 26 स्पर्धकांनी भाग घेतला. प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड व रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा नायर यांनी या स्पर्धामध्ये स्पर्धकांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले व विजेत्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे कार्यकारी संचालक परेश शेठ ठाकूर, तसेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळी खारघर मॅरेथॉन पूर्व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले व सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. या सर्व विजेत्यांना 22 जानेवारी रोजी खारघर मॅरेथॉन 2023 स्पर्धेच्या दिवशी पारितोषिके तसेच प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.