
पनवेल : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेची शाखा आता मिडलक्लास सोसायटीजवळ सुरू झाली आहे. त्याचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, उद्योगपती राजू गुप्ते, कृष्णकांत गुप्ते, जयेश सोनाटा, संस्थापक नीलकांत ग्रुप, एचआयएलचे वितरक गिरीश शहा, रेडिअन्ट ग्रुप किरीट बियानी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बास्कर बाबू, एमडी आणि सीईओ, नारायण राव, मुख्य सेवा अधिकारी आणि रिटेल बँकिंगचे प्रमुख भरथ सोंडूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.