Breaking News

ज्येष्ठांच्या समस्या सोडवू

नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची ग्वाही

पनवेल : प्रतिनिधी

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मी, नगरसेवक तेजस कांडपिळे आणि चारुशीला घरत सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून निश्चित सोडवू, अशी ग्वाही नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी दिली. ते नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिन आणि शिवजयंती उत्सव सोहळ्यात

बोलत होते.

रेल्वे स्थानकाजवळील ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर झालेल्या या सोहळ्यास नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेविका सुशीला घरत, निवृत्त कमांडर जी. एस. सोलंकी आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या वेळी अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कार्याचे कौतुक करताना तुमच्यामुळे येथील अनेक समस्या सुटल्याचे सांगून नगरसेवक तेजस कांडपिळे आणि चारुशीला घरत यांच्या वतीने तुम्हाला खात्री देतो की, आम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्या समस्या निश्चित सोडवू, असेही त्यांनी सांगितले. नगरसेवक तेजस कांडपिळे व निवृत्त कमांडर जी. एस. सोलंकी यांनीही मार्गदर्शन केले. 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा व शांतीवन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काशिनाथ भोईर यांचा सोहळ्यात सत्कार करण्यात आला. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली तेव्हा महाराजांनी ख्रिश्चन धर्मियांच्या चर्चना अभय दिले होते. त्याची आठवण म्हणून संघाचे सदस्य जॉर्ज जोसेफ यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उषा धारपवार, पुष्पा देशमुख, लता जाधव, लीला देशमुख व साधना काटकर यांनी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिकांच्या वाद्यवृंदाचा देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम सादर झाला. यामध्ये दयाराम निंबोळकर, राजन चोपडे व रत्नमाला पाबेकर बहारदार यांनी सदाबहार गीते व दीपक मोदगेकर यांनी माऊथ ऑर्गनवर गाणी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रकाश विचारे, साहेबराव जाधव, गोपाळ धारपवार, गोपाळ रेडकर, हेमंत नेहते, देशमुख व करंगुटकर यांनी मेहनत घेतली.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply