Breaking News

म्हसळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या कायम

म्हसळा : प्रतिनिधी

रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्कींग व पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे म्हसळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने वाढत आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत अनधिकृतपणे वाहने उभी करणे, हातगाडी लावणे, टपर्‍या, बांधकामे, बाजारपेठेत असणारी उनाड गुरे या सर्वच कारणाने म्हसळा शहरातील पाभरे नाका ते दिघी नाका या परिसरांत सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. मुख्य रस्त्यासह शहरांतील अंर्तगत रस्त्यांचीसुद्धा तीच स्थिती आहे.

– श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर परिसरांतून परतीच्या प्रवासाला निघालेले पर्यटक म्हसळा बाजारपेठेत कधीही कुठेही कसेही आपली वाहने थांबवित असल्यानेही म्हसळ्यात वाहतूक कोंडी होते. 

-रितेश अय्यंगार, नागरिक, म्हसळा

म्हसळा ग्रुपग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. नगरपंचायतीने शहरांत वन वे, टू व्हिलर व फोर व्हिलर पार्किंग, रिक्षा स्टँडची सुविधा तयार करणे प्राधान्याचे व महत्वाचे आहे.

-विवेक सहस्त्रबुध्दे, नागरिक, म्हसळा

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply