उरण : वार्ताहर
गेल्या चार वर्षापासून मुस्लीम बांधवांसाठी रमजान ईदला ईद मीलन दावत नामा कार्यक्रम महेश बालदी मित्र मंडळ व भाजपच्या वतीने केला जातो. त्याचप्रमाणे यंदाही महेश बालदी मित्र मंडळ व भारतीय जनता पार्टी उरण तालुका यांच्या वतीने मुस्लीम बांधवांसाठी सोमवार (दि 10) रोजी सिटीझन हायस्कूल उरण येथे ईद मीलन दावत नामाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. त्यांनी उपस्थित मुस्लीम बांधवांना या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मुकिद काझी, उद्योगपती तथा ज्येष्ठ नेते इक्बाल काझी, जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी आदी पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमास उरण नगरपालिका नगराध्याक्षा सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, जस्मिन गॅस, भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष शाहनवाज मुनीर मुकादम, रेयान तुंगेकर, उरण नगरपालिका स्वच्छता व आरोग्य सभापती मेराज रमजान शेख, नगरसेविका जान्हवी पंडित, नगरसेविका यास्मिन गॅस, नगरसेवक नंदू लांबे, फाइक गॅस, नगरसेविका स्नेहल कासारे, उद्योजक चंद्रहास घरत, माजी नगरसेवक राजेश कोळी, नईम कर्वेकर, सर्जील कादरी, अली मुकरी, समीर काजी, राजू खान, समदमुल्ला, नीलेश पाटील, सहीम नेरेकर, मनोहर सहतीया, अब्दुल बसित मुकरी, सिटीझन हायस्कूलचे प्राचार्य आरिफ बक्षी, सगीर मुकरी, इरफान शेख, तसेच मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांचे मानाची टोपी व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष शाहनवाज मुकादम व रेयान तुंगेकर यांनी केले.