Breaking News

सायकलवर प्रवास करून दिला पाणी बचत, स्वच्छतेचा संदेश

पनवेल : बातमीदार

बारामतीहून 10 दिवस सायकलवर प्रवास करून स्वच्छता, पाणी बचत व किल्ले संवर्धनचा संदेश एक 48 वर्षाचा अवलिया देत आहे. 14 जून रोजी हा 48 वर्षीय अवलिया पनवेल येथे आला होता. यावेळी 1220 किलोमीटरचा प्रवास झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

सुभाष चौक, बारामतीहून निघालेले एकनाथ जनार्दन देशमाने (वय 48) हे 7 जून रोजी सायकलवर किल्ले संवर्धन, पाणी बचतीचा संदेश घेऊन निघाले आहेत. 14 जून रोजी ते पनवेलमध्ये आले होते. 16 जून रोजी बारामती येथील घरी परतणार असल्याचे सांगितले. बारामतीहून निघाल्यानंतर आळंदी, तळेगाव, लोणावळा, कारला-भाजला लेणी, कलावंतीन गड, प्रबळगड आदी ठिकाणची भ्रमंती सायकलवर देशमाने यांनी केली आहे. शेवटी एकवीरा देवीचे दर्शन घेऊन बारामतीला परतणार आहेत. कलावंतीन गड, प्रबळगड येथे जाऊन देशमाने यांनी ट्रेकर्सची भेट घेतली.

या वेळी येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. या गडावर जाऊन त्यांनी साफसफाई केली व इतरांना देखील गडावर स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले. 1220 किलोमीटरचा सायकलवर प्रवास करून किल्ल्यांची साफसफाई केली आहे. एकनाथ देशमाने हे सलग 10 दिवस सायकलवर प्रवास करत असून त्यांनी इंधन बचत, पाण्याचा वापर जपून करा असा मौलिक संदेश दिला आहे. त्यासोबतच पर्यावरण वाचवा, प्लॅस्टिकचा वापर टाळा असे आवाहन केले आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply