म्हसळा वाचनालयात शिवपुतळ्याचे पूजन
म्हसळा ः प्रतिनिधी
शिवस्वराज्य दिना निमित्त म्हसळा सार्वजनिक वाचनालयात सोमवारी (दि. 6) 349वा शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले तसेच स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन करण्यात आले. म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील, वाचनालयाचे सचिव अशोक काते, संचालक मंडळ सदस्य सुनिल उमरोटकर, कृषी मंडळ अधिकारी राजेंद्र ढंगारे, कोस्तुभ करडे, ग्रंथपाल उदय करडे, कृषी पर्यवेक्षक डी. पी. सरनाईक,पत्रकार अरुण जंगम, सायली चोगले यांच्यासह वाचक या वेळी उपस्थित होते.
मुरूडमध्ये शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवज्योत मिरवणूक
मुरूड : प्रतिनिधी
शिवस्वराज्य दिनानिमित्त मुरूडमधील अंजुमन इस्लाम कॉलेज तर्फे सोमवारी (दि. 6) शिवज्योेतीची मिरवणूक काढण्यात आली होती. नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, आणि कॉलेजचे सहसचिव रहीम कबले यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवज्योत मिरवणुकीस प्रारंभ झाला. अंजुमन इस्लाम कॉलेजमध्ये या शिवज्योत मिरवणुकीची सांगता करण्यात आली. अंजुमन इस्लाम कॉलेजच्या सभागृहात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ दाखविण्यात आले. शिवस्वराज्य दिनानिमित्त अंजुमन इस्लाम कॉलेजने राष्ट्रीय स्तरावर निबंध, वक्तृत्व व भित्तीचित्र स्पर्धेचे ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने आयोजन केले होते. राष्ट्रीय सेवा योजना, डीएलएलइ, ग्रंथालय व अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रा. शोएब खान, प्रा. नितीन पवार, डॉ. स्वाती खराडे व प्रा. अंजुम दाखवे यांच्यासह विनायक पाटील, जयदीप नाईक, चिन्मय पेटकर, अंजर उलडे, युसूफ कादरी, सौरभ चव्हाण, अभिजित मगर, मेहवाझ हसवारे, मयूर घाग, रय्यान हुकेबद्दार आदी विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
नागोठण्यात शिवमशाल रॅलीने शिवस्वराज्य दिन साजरा
नागोठणे : प्रतिनिधी
कोएसोच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (दि. 6) शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सत्यात उतरवून त्याप्रमाणे वागणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पत्रकार राज वैशंपायन यांनी या वेळी केले. शिवस्वराज्य दिनानिमित्त आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातर्फे सोमवारी शिवाजी पेठ नागोठणे येथील नियोजीत पुतळ्याच्या चौथार्यापासून शिवमशाल रॅली काढण्यात आली होती. महाविद्यालय विकास समिती सदस्य अनिल काळे, अॅड. सोनल जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. त्यानंतर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र गीताने झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राचार्य डॉ. संदेश गुरव, अॅड. सोनल जैन, अनिल काळे, पत्रकार राज वैशंपायन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनुजा वाटवे, खांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीकृष्ण तुपारे यांनी केले. प्रा. दिनेश भगत, प्रा. डॉ. विजय चव्हाण, प्रा. हेमंत जाधव, प्रा. डॉ. स्मिता चौधरी, ज्योती पाटील, विनया पाटील यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. डॉ. विकास शिंदे यांनी आभार मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
हिरवळ महाविद्यालयाची रायगडावर स्वच्छता
माणगाव : प्रतिनिधी
शिवस्वराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे महाड येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मुंबई विद्यापीठ व रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आणि शनिवारी रायगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी रायगड किल्ल्याच्या विविध भागातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम केले. तसेच किल्ल्यावरील राजदरबारात पर्यटकांसमोर किल्ले संवर्धन व स्वच्छता या विषयावर पथनाट्य सादर करून जनजागृती केली. रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. तुळशीदास मोकल, हिरवळ महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. कोमल गायकवाड उपस्थित होते.
माणुसकी प्रतिष्ठानची कनकेश्वर डोंगरावर स्वच्छता मोहीम
अलिबाग : रामप्रहर वृत्त
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर व संडे कनकेश्वर ट्रेक टीम यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर डोंगरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कनकेश्वर पायथ्यापासून ठिकठिकाणी मांडवा लायन्स क्लबकडून कायम स्वरूपात कचराकुंडी बसविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बराच कचरा जमा केला जातो. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तानाजी आगलावे, संडे कनकेश्वर ट्रेक प्रमुख उमेश वाळंज, आरसीएफ अधिकारी तुषार कोलते, आनंदी स्कुलच्या शिक्षिका धनश्री, प्रतिष्ठानचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. अश्विनी हुलवान, अर्चित कोलते, सिद्धेश रानवडे यांच्यासह इतर सदस्यांनी या मोहिमेत भाग घेवून कनकेश्वर डोंगरावरील कचरा गोळा केला.
पर्यटकांनी डोंगर, दुर्ग परिसरात कचरा, प्लास्टीक टाकू नये. शक्य झाल्यास कचरपिशवी जवळ ठेवावी व परिसरात पडलेला कचरा गोळा करून कचराकुंडी किंवा पुनर्वापराकरिता द्यावा.
-डॉ. राजाराम हुलवान, अध्यक्ष, माणुसकी प्रतिष्ठान