एकनाथ देशेकर यांचा विश्वास
पनवेल : रामप्रहर वृत्त
शिरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सदस्यपदाचे उर्वरित सर्व उमेदवार, तसेच थेट सरपंचपदाच्या
उमेदवारही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होऊन ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य एकनाथ देशेकर यांनी व्यक्त केला आहे.
पनवेल तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 24 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या ठिकाणी भाजपला अनुकूल वातावरण असून, पक्षाच्या सर्व उमेदवारांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2मधून नंदा पाटील व भाऊदास सिनारे आणि प्रभाग 1मधून परशुराम अप्पा रिकामे असे तीन उमेदवार निवडून आले आहेत.
या पार्श्वभूमीवर एकनाथ देशेकर म्हणाले की, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व या जोरावर आम्ही भाजपच्या विजयासाठी झटत आहोत. आम्हाला तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. त्यामुळे केलेल्या विकासकामांची परतफेड लोक आम्हाला मतांच्या रूपाने करतील आणि भाजपचे सर्व उमेदवार नक्कीच विजयी होतील.