पनवेल : बातमीदार
पनवेल तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी 24 मार्च रोजी निवडणूक होत आहेत. कर्नाळा, कुंडेवहाळ आणि चिपळे या तीन
ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यामुळे 24 मार्चला मतदान; तर 25 मार्चला मतमोजणी होणार आहे.
चिपळे ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिला, कुंडेवहाळचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून, कर्नाळा ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्ग असे राखीव आहे.