Friday , September 22 2023

यूईएस स्कूलमध्ये शिवजयंती साजरी

उरण : वार्ताहर

येथील यूईएस स्कूल अ‍ॅण्ड कॉलेजमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याजवळ विद्यार्थी व पालकगण पारंपरिक वेषभूषेत जमले होते. यूईएस संस्थेच्या विश्वस्त, पदाधिकार्‍यांनी शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ढोल-ताशा व लेझीमच्या लयबद्ध वाद्यवृंदासह शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक विद्यालयाच्या दिशेने निघाली. पालखीतील शिवरायांच्या मूर्तीची वाजतगाजत विमला तलाव ते पालक मैदान अशी भव्य मिरवणूक काढली. या वेळी काही विद्यार्थी ‘जिजाऊ’ व ‘बाल शिवाजी’च्या वेशभूषेत आले होते. मिरवणुकीत संस्थेचे अध्यक्ष तनसुख जैन, उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, मानद सचिव आनंद भिंगार्डे, खजिनदार विश्वास दर्णे, माजी प्राचार्य व सदस्य प्रधान मॅडम, माजी अध्यक्ष व सदस्य डॉ. राजेंद्र भानुशाली, सिनियर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका, सिनियर कॉलेजचे एचओडी, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सुपरवायझर्स, पीटीए मेंबर्स, पालक, शिक्षक सहभागी झाले होते. पालखीचे पालक मैदानात आगमन होताच लेझीम पथकाने रिंगण करून सुंदर नृत्य सादर केले. शिक्षिका चेतना घरत यांनी शिवरायांची महती आपल्या भाषणातून सांगितली. त्यानंतर सरस्वती मंडपातील भव्य व्यासपीठावर शिक्षिका रेश्मा वैद्य व सोनल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी दैवत छत्रपती या एका वीररसाच्या मराठी गाण्यावर महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना व प्रसंग नृत्य स्वरूपात सादर केले.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply